डफळापूर न्युज
डफळापूर परिसरातील महत्वाच्या बातम्या
मुंबईहून आलेला अंकलेतील एकजण कोरोना पॉझिटिव्ह | जत तालुक्यात पहिला रुग्ण | पश्चिम भाग हादरला
जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा नं २ डफळापूर येथे आज विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली
*जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा नं २ डफळापूर येथे आज विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली . जयंती साजरी करत असताना सर्वांनी एक गोष्ट मात्र केली कि कोरोना च्या प्रादुर्भावा मुळे सर्व जण जवळ न उभे राहता अंतर ठेवून उभे राहिले .ज्या महान व्यक्तिने आम्हाला संविधानाचा कायदा दिला अशा महान व्यक्तिच्या जयंती दिवशी आम्ही कसे नियम मोडणार अशा महान व्यक्तिच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी केंद्र प्रमुख श्री बेले सर .शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास शिंंदे ,संजय सुर्यवंशी, शिक्षक वर्ग श्री संकपाळ सर , डोंगरे सर ,रठोड सर व मी इत्यादी सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होते*
सहाय्यक कंमाडर[ CRPF ] भाऊसाहेब वाघमारे यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी प्रदिर्घ आजाराने दिंनाक .११ एप्रिल २०२० रोजी दुःखद निधन झाले .
श्री भाऊसाहेब मारूती वाघमारे साहेब , (सहाय्यक कंमाडंर CRPF ) यांचे डफळापूर ता .जत येथे वयाच्या ७३ व्या वर्षी प्रदिर्घ आजाराने दिंनाक .११ एप्रिल २०२० रोजी सांय .८ :००वा दुःखद निधन झाले . शालेय जीवनामध्ये उत्कृष्ठ व्हॉलीबॉलपटू म्हणुन परिचित होते. घरची परिस्थिती बेताची असलेने ते २८ / ५ / १९६५ रोजी CRPF सशस्त्र सैन्यामध्ये ( सांगली ) या ठिकाणी भरती झाले. शिपाई ते असिंटंट कंमा डेट या पदापर्यंत पोहचले . त्यांनी काश्मीर श्रीनगर , आसाम ,पंजाब, बांगलादेश गुजरात , ओडिसा , उतरप्रदेश,आयोध्या शिलाँग, भुवनेश्वर . मुंबई ,इं ठिकाणी उत्कृष्ठ सेवा बजावली त्यामुळे त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानीत केले .,पुणे तळेगांव कॅम्पस , या ठिकाणी असिं कमा डेट या पदावरून दिं ३१ / ५ / २००४ रोजी सेवानिवृत झाले. सेवा समाप्ती नंतर ही त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले . गांवातील विविध संस्थांनी, विजय सिंह डफळे हाय . जिप शाळा ग्रा पं. बौद्ध सेवा संघ यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला .त्यांनी डफळापूर ग्रा .प. तंटामुक्त कमिटीमध्ये काम केले . त्यांच्या पाश्चात पत्नी मुली , मुले अनिल, सुनिल , राकेश , ६नातवंडे व नातू पैलवान कुणाल वाघमारे , असा परिवार आहे .आशा या उतुंग व्यक्तिमत्वास आम्ही डफळापूरकर परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत.💐💐💐💐👏👏
मुंबईहून आलेला अंकलेतील एकजण कोरोना पॉझिटिव्ह | जत तालुक्यात पहिला रुग्ण | पश्चिम भाग हादरला
धक्कादायक | मुंबईहून आलेला अंकलेतील एकजण कोरोना पॉझिटिव्ह | जत तालुक्यात पहिला रुग्ण | पश्चिम भाग हादरला जत, तालुक्यातील अंकले य...
-
* जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा नं २ डफळापूर येथे आज विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली . जयंती साजर...
-
धक्कादायक | मुंबईहून आलेला अंकलेतील एकजण कोरोना पॉझिटिव्ह | जत तालुक्यात पहिला रुग्ण | पश्चिम भाग हादरला जत, तालुक्यातील अंकले य...
-
श्री भाऊसाहेब मारूती वाघमारे साहेब , (सहाय्यक कंमाडंर CRPF ) या...